...अन् ही कृष्णाबाई तळेकर, कृष्णाबाई सुर्वे झाली. मग पुढे कुठे जायचं? घरदार नव्हतंच…
मराठीतील एक क्रांतिकारी कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या पत्नी, कृष्णाबाई सुर्वे यांचं काल मंगळवारी, २१ जून २०२२ रोजी नेरळ (ता. कर्जत) येथील राहत्या पहाटे चार वाजता वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्या केवळ नारायण सुर्वे यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या ‘अभिन्नजीव सहकारी’ही होत्या. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या तर लग्नाआधीपासूनच शब्दश: आणि अक्षरक्ष: सावलीसारख्या पाठीशी राहत आल्या.......